Mumbai, मे 7 -- Tips to Manage Asthma: दमा हा एक श्वसनाचा आजार आहे. ज्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतो आणि सूज येते. ज्यामुळे छातीत घरघर, दम लागणे, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. दम्याची कारणे तणाव, धुम्रपान, पराग कण, धूळ, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, रसायने आणि प्रदूषणाचा संपर्क, सायनुसायटिस श्वसन संक्रमणासारख्या समस्या आढळून येतात. देशात या आजाराचे प्रमाण वाढत असून त्यामुळे विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या स्थितीचे अचूक निदान करणे तसेच उपचाराबाबत स्वतःला साक्षर करणे गरजेचे आहे. परेल येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे संचालक - पल्मोनोलॉजी अँड लंग ट्रान्सप्लांट डॉ. समीर गर्दे यांनी दम्याचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी टिप्स दिल्या आहेत.

World Asthma Day 2024: दम्याच्या रुग्णांनी या गोष्टींपासून राहावे दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ वाढव...