Mumbai, मे 2 -- Weather News: महाराष्ट्रातील तापमानात (Maharashtra Temperature Today) गेल्या १५ दिवसांपासून सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. तर, कुठे उष्णतेच्या लाट (Heat Wave) पाहायला मिळत आहे. याच पाश्वभूमीवर हवामान विभागाने (IMD) छत्रपती संभाजीनगरातील (Chhatrapati Sambhajinagar) नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) येत्या २४ तासांत अवकाळी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागात उष्णतेचा पारा वाढला आहे. वर्ध्यात सर्वाधिक तापमानाची (४२.५ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली. तर, चंद्रपूर, यवतमाळमध्ये उष्णतेच्या लाटेचा आणि वर्ध्यामध्ये उष्ण रात्रीचा यलो अलर्ट जाही करण्यात आला. कोंकण, ...