Pune, मे 1 -- Pune viral News : पुण्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची झाडे आहेत. या सध्या हंगाम असल्याने ही झाडे आंब्यांनी लगडली आहेत. हे आंबे तोडून खाण्याचा मोह अनेकांना होतो. मंगळवारी असाच एक १०० किलोचा व्यक्ति १०० फुट उंच असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे तोडण्यासाठी चढला. मात्र, अचानक तो झाडावरच बेशुद्ध पडला. सुदैवाने हा व्यक्ति झाडांच्या फांद्यांमध्ये अडकला. दरम्यान, ही बाब झाडांखालून जणाऱ्यांना निदर्शनास आली. एक व्यक्ति बेशुद्ध अवस्थेत झाडावर अडकून पडला असल्याने त्यांनी ही बाब अग्निशामक दलाला कळवली. अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी येत त्यांनी या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास घडली.

कोथरूड येथे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कोथरुडच्या अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला एक इसम आंब्याच्या...