Mumbai, मे 1 -- Rajasthan Viral News: मित्रासोबत पिस्तूल घेऊन व्हिडिओ बनवत असताना पिस्तुलातील गोळी छातीवर लागल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही राजस्थानच्या कोटा येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत नागर असे मृत तरुणाचे नाव असून तो झालावाड जिल्ह्यातील रहिवासी आहे. नागर हा मानव्यविद्या विषयात पदवीचे शिक्षण घेत होते आणि कोटा येथे राहत होते. ही घटनेबाबत पोलिसांनी बुधवारी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महावीर नगर एक्सटेंशनमधील महर्षी गौतम भवनजवळील चहाच्या टपरीवर दुपारी तीनच्या सुमारास यशवंत नागर पिस्तुलासह व्हिडिओ बनवत होता. मात्र, त्याचवेळी पिस्तुलातील सुटून यशवंत नागरच्या छातीवर लागली. या घटनेनंतर यशवंत नागरला तात्काळ न्यू मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्...