Mumbai, मार्च 11 -- Wrestling Trials for Paris Olympic 2024 : या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय कुस्तीपटूंची निवड चाचणी सुरू आहे. पण या निवड चाचणीदरम्यान, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने सोमवारी (११ मार्च) पटियाला येथे चांगलाच गोंधळ घातला. विनेशला दोन वजनी गटात खेळायचे होते.

बराच गदारोळ झाल्यानंतर विनेशला दोन सामन्यांमध्ये भाग घेण्याची परवानगी देण्यात आली. तिने ट्रायल्समध्ये महिलांच्या ५० किलो आणि ५३ किलो वजनी गटात भाग घेतला. मात्र यादरम्यान तिने ५० किलो वजनी गटात बाजी मारली. तर ५३ किलो वजनी गटात विनेशला पराभवाचा सामना करावा लागला.

५३ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत विनेशचा ०-१० अशा फरकाने पराभव झाला. मात्र ५० किलो वजनी गटात विजय मिळवल्यानंतर विनेशला आता आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे. तिने ५० किलो वजनी गटाच्या...