Mumbai, मे 2 -- आज गुरुवार २ मे रोजी, चैत्र कृष्ण नवमी असून, धनिष्ठा नक्षत्र आणि शुक्ल योग आहे. आज चंद्र मकर राशीनंतर कुंभ राशीत संक्रमण करणार आहे. तैतील करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

आज आर्थिक प्रगती होईल. कामे लवकर पूर्ण होतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळेल. मोठ्या व्यवहारात आर्थिक फसवणुक होणार नाही याची सावधानी बाळगा. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. स्वभावातील रागीटपणावर मात्र नियंत्रण ठेवा. खरेदी करण्याचा मूड राहील.

आज प्रमोशन मिळण्याचे योग येतील. जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संतती कडून उत्तम सुख मिळेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. आळशी वृत्ती टाळावी. प्रवासातून आर्थि...