Delhi, एप्रिल 20 -- supreme court ramdev patanjali : रामदेव बाबा यांच्या पतंजली योगपीठ ट्रस्टला शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एक धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपीलीय न्यायाधिकरणाचा निर्णय कायम ठेवला आहे. न्यायाधिकरणाच्या निर्णयात रामदेव यांच्या ट्रस्टला योग शिबिरे आयोजित करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या प्रवेश शुल्कावर सेवा कर भरण्यास सांगितले. न्यायमूर्ती अभय एस ओका आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने सीमाशुल्क, अबकारी आणि सेवा कर अपीलीय न्यायाधिकरण (CESTAT) च्या अलाहाबाद खंडपीठाच्या ५ ऑक्टोबर २०२३ च्या निकालात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

ट्रस्टचे अपील फेटाळून लावताना खंडपीठाने सांगितले की, "फी आकारलेल्या शिबिरांमध्ये योगासने करणे ही सेवा आहे, असे कोर्टाने योग्य मानले आहे. या आदेशात हस्तक्षेप करण्याचे आम्हाला कोणतेही कारण नाह...