Mumbai, एप्रिल 28 -- आज शुक्रवार २८ एप्रिल रोजी, चैत्र कृष्ण चतुर्थी नंतर पंचमी तिथी असून, मूळ नक्षत्र आणि शिव योग आहे. आज चंद्र धनु राशीत संक्रमण करणार आहे. कौलव करणात कसा जाईल आजचा दिवस. वाचा आजचे राशीभविष्य थोडक्यात!

आज खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. व्यवसायात व्यवहार जास्त सांभाळाल. जुनी मित्रमंडळी भेटतील. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. ग्रहयोग उत्तम आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराट होऊ शकते, धनलाभ होईल. आर्थिक प्रगतीचा दिवस ठरेल. दूरदृष्टी ठेऊन कामाची आखणी कराल.

आज प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. कंटाळा न करता कामाला लागा. घरामध्ये प्रत्येकाची उगीचच काळजी कराल. मनःस्वास्थ्य हरवून बसाल. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापारात उत्पन्नात वाढ होईल. नातेवाईकांसोबत असले...