भारत, एप्रिल 18 -- मनसे प्रमुख राज ठाकरे व नरेंद्र मोदी मुंबईत एकाच व्यासपीठावर येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मनसे नेते अमित ठाकरे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून शिवाजी पार्कवर दोघांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.राज ठाकरे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, 'राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी पो...