Mumbai, फेब्रुवारी 9 -- Happy Birthday Rahul Roy: बॉलिवूडला लोक मायानगरी आणि स्वप्नांचे शहर असेही म्हणतात. कदाचित बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडल्या असतील, ज्यामुळे बॉलिवूडला ही विशेषणं देण्यात आली. १९९०मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आशिकी' चित्रपटातील राहुल रॉयसोबत देखील असंच काहीसं घडलं. अभिनेता राहुल रॉय याला पहिल्याच चित्रपटातून भरपूर स्टारडम मिळाले, पण ते फार काळ टिकू शकले नाही. बॉलिवूड अभिनेता राहुल रॉय आता ५६ वर्षांचा झाला आहे. राहुल रॉय याचा जन्म ९ फेब्रुवारी १९६८ रोजी कोलकाता येथे झाला. आज राहुल रॉयच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी...

चित्रपटसृष्टीत एक चांगली भूमिका मिळण्यासाठी लोकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागते. मात्र, राहुल रॉयला केवळ २० मिनिटांच्या भेटीत त्याच्या पहिल्याच चित्रपटात...