Pune, मार्च 21 -- Pune loksabha 2024 :राज्यात लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. त्यात राज्यात यंदा काही काटे की टक्कर असलेल्या लढती बघायला मिळणार आहे. त्यात पुणे जिल्ह्यात पाहिलं तर बारामतीत पवार विरुद्ध पवार या लढतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असतानाच आता पुणे लोकसभेसाठीदेखील तगडे उमेदवार मैदानात उतरणार आहे. यंदा राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघडी अशी लढत रंगणार आहे. त्यात पुणे लोकसभेचं पाहिलं तर महायुतीकडून पुण्याचे अण्णा मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभेचे आमदार रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास पुण्यात यंदा अण्णा विरुद्ध भाऊ अशी लढत रंगतदार लढत पाहायला मिळणार आहे.

महायुतीकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असताना भा...