PUne, फेब्रुवारी 6 -- EVM Machine Stolen From Saswad In Pune : निवडणुका तोंडावर आल्या असताना नुकतीच एक धक्कादाक घटना समोर आली आहे. तहसीलदार कार्यालयातून तीन अज्ञात व्यक्तींनी ईव्हीएम मशीन चोरून नेले आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

लोकसभा निवडणुक लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. असे असतांना पुण्यात सासवड तहसील कार्यालयाच्या गोदामातून ईव्हीएममशीन चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. आरोपी तहसील कार्यालयातून मशीनची चोरी करतांना दिसत आहेत. तब्बल तीन आरोपींनी या मशीन लंपास केल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांचा शोध घे...