Mumbai, मार्च 14 -- Paytm Layoffs news : पेटीएम पेमेंट्स बँकेवर रिझर्व्ह बँकेनं (RBI) घातलेल्या निर्बंधांचा फटका पेटीएमच्या ग्राहकांनंतर आता कर्मचाऱ्यांनाही बसण्याची चिन्हं आहेत. वार्षिक कामगिरीच्या आढाव्यानंतर कंपनीच्या वेगवेगळ्या विभागात नोकरकपात केली जाण्याची शक्यता आहे.

मनी कंट्रोलनं या संदर्भात वृत्त दिलं आहे. नेमक्या किती लोकांच्या नोकऱ्या जाणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परंतु कंपनीतील काही विभागांना त्यांच्या टीममध्ये २० टक्के कपात करण्यास सांगण्यात आल्याचं समजतं. मनी कंट्रोलच्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वीच कपातीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Xiaomi vs Samsung: शाओमी १४ अल्ट्रा की सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा, कोणता फोन खरेदी करावा? वाचा

पेटीएमच्या प्रवक्त्यानं या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, सध...