Mumbai, मे 1 -- Mumbai Local News: छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाजवळ (Chhatrapati Shivaji Terminus) सोमवारी (२९ एप्रिल २०२४) पनवेल- सीएसएमटी लोकल ट्रेनचा (Panvel- CSMT) डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. या घटनेला आठवडा उलटला नाही, तोच पुन्हा एकदा पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकलचा डबा रुळावरून खाली घसल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. यामुळे हार्बर मार्गावरील सेवा ठप्प झाली (CSMT-Wadala Harbour Train Services Disrupted) असून प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर आल्याने प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनजवळील रेल्वे ट्रॅक एका आठवड्यात दुसऱ्यांदा रुळावरून घसरला. ज्यामुळे सीएसएमटी आणि वडाळा दरम्यान हार्बर मार्गावरील उपनगरीय सेवा विस्कळीत झाल...