भारत, फेब्रुवारी 11 -- बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही कायमच चर्चेत असते. कधी तिच्या चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे. तिचे 'धाकड', तेजस आणि चंद्रमुखी २ हे तीनही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप होताना दिसले. आता कंगनाचा लवकरच 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आहे. तिने भारताची पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

कंगना रणौत सध्या तिचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी'चे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच एका कार्यक्रमामध्ये तिला देशाची पंतप्रधान होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिनेत्रीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'मी इमरजंसी नावाचा चित्रपट करत आहे. हा चित्रपट पाहिल्यावर कोणीही मला पंतप्...