Mumbai, मार्च 18 -- iPhone Sale at Vijay Sales: विजय सेल्सवर सा आयफोन १५, आयफोन १४, आयफोन १३ च्या खरेदीवर आकर्षक ऑफर्स देण्यात आल्या आहेत. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म दरवर्षी हा सेल आयोजित करतो, जिथे आयफोन, मॅकबुक्स, एअरपॉड्स, आयपॅड आणि अ‍ॅपल वॉचेस सारख्या अ‍ॅपलच्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट आणि इतर आकर्षक ऑफर्स आणतात. यंदा हा सेल १६ मार्चपासून सुरू झाला असून २४ मार्चपर्यंत चालणार आहे. खरेदीदारांना मोठी सूट मिळवण्यासाठी केवळ एका आठवड्याचा अवधी देण्यात आला आहे

आयफोन १५ सीरिजच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. आयफोन १५ प्रो मॅक्सची मूळ किंमत १ लाख ५९ हजार ९०० रुपये आहे. मात्र, हा फोन अवघ्या १ लाख ४९ हजार २४९ रुपये झाली आहे. आयफोन १५ प्रोच्या किंमतीत ही ७ टक्क्यांची घसरण झाली. आता या फोनची किंमत १ लाख २५ हजार ९०० रुपये झाली आहे. दरम्यान, व्...