भारत, मे 1 -- google cost cutting : जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांमधील कॉस्ट कटींगचा खेळ सुरूच आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने नोकऱ्या कपातीच्या बातम्या येत आहेत. आता गुगलने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली मोठा निर्णय घेतला आहे. एका रिपोर्टनुसार, गुगलने आपल्या संपूर्ण पायथन टीमला काढून टाकले आहे. असे सांगितले जात आहे की कंपनी अमेरिकेबाहेर स्वस्त कर्मचारी नियुक्त करून पायथन व्यवसाय चालवण्याचा विचार करत आहे. या विषयावर बोलताना, गुगलने टेक क्रंचला सांगितले की, हा निर्णय कंपनीच्या संघटनात्मक पुनर्रचनेचा एक भाग आहे. गुगलने पुढे सांगितले की, कंपनीने पायथनमधून काढलेल्या कर्मचाऱ्यांना इतर कंपन्यामध्ये सामील होण्याची ऑफर देखील दिली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या अहवालानुसार, गुगलने जर्मनीतील म्युनिकमध्ये एक नवीन टीम तयार केली आहे. या...