Karnataka, मे 6 -- Viral Video: कर्नाटकात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी खांद्यावर हात ठेवणाऱ्या कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून विरोधकही शिवकुमार यांच्या वागणुकीकडे बोट दाखवत आहेत. कर्नाटकात डीके शिवकुमार हे 'डीके' म्हणून प्रसिद्ध आहेत. शिवकुमार हे शनिवारी हावेरी येथील सावनूर येथे पक्षाच्या प्रचारासाठी गेले. शिवकुमार एसयूव्हीतून बाहेर येताच एका कार्यकत्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे शिवकुमार संतापले आणि त्यांनी संबंधित कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मनपा सदस्य अलाउद्दीन मणियार यांनी काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचे दिसत आहे. मात्र, ही गोष्ट शिवकुमार यांना खटकली. त्...