Mumbai, फेब्रुवारी 20 -- Deepika Padukone Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच 'बाफ्टा अवॉर्ड्स २०२४'मध्ये हजेरी लावली होती. दरम्यान, अभिनेत्री आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या प्रेग्नेंसीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या पाच वर्षांनंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरात चिमुकलं बाळ येणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असेही म्हणण्यात आलेय की, अभिनेत्री दीपिका पादुकोण हिचा दुसरा त्रैमासिक सुरू असून, आता लवकरच ती आई होणार आहे.

'द वीक'च्या रिपोर्टनुसार, असा दावा केला जात आहे की दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह लवकरच पालक होणार आहेत. या जोडीच्या एका जवळच्या सूत्राने याबद्दल माहिती देताना अभिनेत्री आई होणार असल्याचे सांगितले आहे. या सूत्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, दीपिका आणि...