भारत, मार्च 17 -- Bharat Jodo Nyaya Yatra: काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (शनिवार, १६ मार्च २०२४) मुंबईतील (Mumbai) चैत्यभूमीवर भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप केला. तसेच त्यांनी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी काँग्रस पक्षाची सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा देखील उपस्थित होत्या. यापूर्वी त्यांनी धारावीतील जनतेला संबोधित करताना महिलांना अश्वासन दिले. काँग्रेस पुन्हा सत्तेत आल्यानंतर महिलांच्या खात्यात दरवर्षी १ लाख रुपये येतील, असे त्यांनी म्हटले.

मुंबईत भारत जोडो यात्रेचा समारोप करताना राहुल गांधी म्हणाले की, "काँग्रेसच्या गेल्या यात्रेत आम्ही 'द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान' उघडले होते. लोकांनी मला सांगितले की बराच चाललो. पण मी बऱ्याच ठिकाण...