New Delhi, फेब्रुवारी 16 -- Mallikarjun Kharge on Income Tax action : इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेस पक्षाची सर्व बँक खाती गोठवल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस पक्षानं देशातील सत्ताधारी भाजप सरकारवर चौफेर हल्ला चढवला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनाक्रमावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात देशात निवडणुकाच होणार नाहीत हे आम्ही म्हणूनच आतापर्यंत सांगत होतो, असं खर्गे यांनी म्हटलं आहे.

२०१८-१९ चं इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यास उशीर झाल्याच्या कारणास्तव इन्मक टॅक्स विभागानं ही कारवाई केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आज दिली. मात्र, असा उशीर अनेकदा होत असतो. त्यासाठी अशी कारवाई करणं आश्चर्यकारक आहे. सार्वत्रिक निवडणूक घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं....