भारत, फेब्रुवारी 12 -- 'स्पाइस जेट' ही विमान कंपनी सध्या प्रचंड आर्थिक अडचणीचा सामना करतेय. (Spicejet to cut job) तोट्यात चाललेल्या स्पाइसजेट कंपनीला खर्च भागवण्यासाठी निधीची मोठी गरज निर्माण झाली असून खर्च कमी करून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहे. याचाच भाग म्हणून स्पाइसजेटमधील एकूण कर्मचारीसंख्येच्या १५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे १४०० कामगारांना नोकरीवरून काढले जाणार असल्याचे वृत्त 'इकॉनॉमिक टाइम्स'ने दिले आहे.

स्पाइसजेट कंपनीत गेले अनेक महिने कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीए. अनेक कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे पगार अद्याप झाले नसल्याचे वृत्त आहे. कर्मचाऱ्यांचे एकूण ६० कोटी रुपयांचे पगार थकीत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, कर्मचारी कपातीबाबतच्या वृत्ताबाबत स्पाइस...