भारत, मार्च 11 -- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गटातील निलेश लंके शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आताकाँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या एका ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे,धनंजय मुंडेंसह अजित दादा गटातील १२ नेते भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा लोंढे यांनी केला आहे.

अतूल लोंढे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की,"धोके पे धोका..ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपाने ने ठगा नही! सुनिल तटकरे, धनंजय मुंडे यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्री आदिती तटकरे, सुनिल शेळके यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे १२ बडे नेते, मंत्री आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या शिल्लक राहिलेल्या राष्ट्रवादीचा दुसरा गट शरद पवार साहेबांच्या...