Mumbai, एप्रिल 8 -- Health Care: आधुनिक जीवनशैलीमुळे विविध आरोग्‍यविषयक समस्‍यांचा सामना करावा लागत आहे, ज्‍यापैकी एक म्‍हणजे निद्रानाशेचे वाढते प्रमाण. कामाचे व्‍यस्‍त वेळापत्रक, सतत डिजिटल डिवाईसेसमध्‍ये गुंतून राहणे आणि उच्‍च तणाव अशा घटकांमुळे झोपेचा हा आजार सामान्‍य होत आहे. निद्रानाशेचा व्‍यक्‍तींवरील परिणाम दिसून येऊ शकतो, जसे दिवसा थकवा जाणवणे, अवधान न लागणे आणि मूड उत्‍साहित न राहणे. आज समाजात व्‍यस्‍त व उत्‍पादनक्षम जीवनशैलीला अधिक प्राधान्‍य दिले जात असताना अपुऱ्या झोपेचे परिणाम प्रकर्षाने दिसून येत आहेत.

निद्रानाशेचे निराकरण करण्‍यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनाची गरज आहे, ज्‍यामध्‍ये पुरेशी झोप, तणाव व्‍यवस्‍थापन तंत्रे आणि समस्‍येच्‍या मूळ कारणाचे निराकरण करण्‍यासाठी आयुर्वेदाचा वापर यांचा समावेश आहे. आयुर्वेदामध्‍ये विशेष आहा...