Pune, एप्रिल 24 -- Pune mulshi crime news : पुण्यात गुन्हेगारीच्या आणि गोळीबाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गेल्या आठवड्यात गोळीबाराच्या चार घटना घडल्या असून आता गुन्हेगारांनी पोलीसांवरच गोळीबार केल्याची घटना घडली. पोलिसांनी देखील त्याला बंदुकीनेच उत्तर देत त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करत त्याला बेड्या ठोकल्या. ही थरारक घटना मुळशी तालुक्यातील मुठा गावात मंगळवारी घडली. पुण्यातील जनता वसाहतीतील अट्टल गुन्हेगार नवनाथ उर्फ नव्या निलेश वाडकर (वय १८ रा.जनता वसाहत, पर्वती) आणि केतन साळुंखे अशी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराची नावे आहेत. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

नवनाथ वाडकर हा सराईत गुंड आहे. त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न, दरोडा या सारखे गुन्हे दाखल आहे. तो गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत फरार...